Sunday, 15 May 2011

01/10/2010

हा रीलॅप्स खरा तर सध्या सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगायचे तर त्याचे वर्णन 'माज' असे करता येईल. पण माझ्यामते ते तितकेसे खरे नाही, कारण याबाबत माझे असे मत आहे की, 'कृपा' किंवा ए.ए. चे साहित्य हे विशिष्ट प्रकारचे संस्कारच असतात, त्यानुसार माझ्यात कांही मला आणि इतरांना देखील जाणवणारे बदल हे होत असतात. त्याचे कांही सकारात्मक परिणाम देखील मला मिळू लागतात. मात्र त्याचवेळी हे बदल मला नकोसे देखील होतात. किंवा ते तसेच राहतील का? मला ते पेलवतील का? या शंका मनात घर करतात. त्याचा परिपाक किंवा परिणीती ही हा रीलॅप्स घडण्यात होते.
आज आउटपूटमध्ये वेक अप कॉल यासंबंधी बोलण्यास सांगितले. पण मी ते टाळले कारण वेक अप कॉल ला वास्तवाची 'जाणीव' हा शब्द वापरणे उचित राहील. (पण इथे 'जाणीव' या शब्दाचे पेटंट आणि कॉपीराईट असल्याने त्याचे हक� [...]



No comments:

Post a Comment